Accident of police van  Team Lokshahi
ताज्या बातम्या

अधिवेशनातून परत येणाऱ्या पोलीस व्हॅनचा अपघात,चालक गंभीर जखमी

नागपूरवरून अमरावतीकडे जात असताना पोलीस व्हॅनची उड्डाणपूलाच्या भिंतीला धडक दिल्याची घटना घडली आहे.

Published by : shweta walge

भूपेश बारंगे, वर्धा : नागपूरवरून अमरावतीकडे जात असताना पोलीस व्हॅनची उड्डाणपूलाच्या भिंतीला धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज दुपारी एक वाजता सुमारास घडली. अपघात जखमी चालकाला तात्काळ कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नागपूर येथील अधिवेशनात पाठविण्यात आलेल्या पोलीस वाहन अधिवेशनाचे सूप वाजल्याने आता परतीच्या मार्गावर आहे. वाशीम जिल्ह्यातील पोलीस वाहन नागपूर येथील अधिवेशनात पाठविण्यात आले होते. पोलीस व्हॅन क्र. महा 37 ए 4176 या वाहनाच्या समोरील वाहनाने वाहन हळुवार घेतल्याने वाहन वाचवण्याच्या नादात पोलीस वाहनाच्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन उड्डाणपूलाच्या भिंतीला धडक दिली. धडक इतकी भयंकर होती की पोलीस वाहनाचा कॅबिनच भागाचे मोठं नुकसान होऊन चालक देवानंद जगदेव मेश्राम हा गंभीर जखमी झाला.

अपघात जखमी चालकाला तात्काळ कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद कारंजा पोलिसांनी घेतली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद वानखडे , हर्षल मुन ,रवींद्र अवचारे ,सचिन इंगळे करत आहे.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती