ताज्या बातम्या

बदलापूरमधील शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार; चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बदलापूरच्या घटनेवरुन पालकांसह नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांकडून बदलापूर स्टेशनवर रेलरोको आंदोलन करण्यात येत असून रेल्वेसेवा ठप्प आहेत. यावर आता प्रतिक्रिया येत आहेत. चित्रा वाघ यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. चित्रा वाघ म्हणाल्या की, बदलापुरातील हरामखोर नराधमाला फाशीच होणार…!बदलापुरात शाळेमध्ये चार वर्षीय दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत निंदनीय आणि विकृतपणाचा कळस आहे. मी स्वतः एक आई असून या चिमुकल्यांच्या कुटुंबावर काय संकट कोसळले असेल, याची कल्पना करू शकते.

या प्रकरणातील आरोपी कोणत्याही परिस्थितीत सुटणार नाही. राज्याचे गृहमंत्री आणि गृहखाते अत्यंत सक्षम असून या प्रकरणाचा छडा लवकरात लवकर लागेल, तशा सूचना पोलीस खात्याला दिल्या गेल्या आहेत. या हरामखोर क्रूरकर्म्याला फाशीच होणार. या घटनेत 2 तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे. बदलापुरात नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला असून रस्ता रोको, रेल रोको सारखी आंदोलने सुरू झाली आहेत. आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी गृह खाते 'अलर्ट मोड'वर आहे. गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून त्यांनी पोलिसांना योग्य सुचना ही दिल्याहेत

या प्रकरणात संस्थेची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेले आहेत. समाजामध्ये अशी विकृत मानसिकता वाढत चालली असून काहीही कुठेही अनुचित प्रकार घडला तर तात्काळ पोलिसांना कळवावे. तसेच पालकांनी सुद्धा अत्यंत सजग राहावे, अशी माझी सर्व पालकांना नम्र विनंती आहे. असे चित्रा वाघ म्हणाल्या.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result