लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आज नवनीत राणा आणि रवी राणा यांनी अभिजीत अडसूळ यांची भेट घेतली आहे. अभिजीत अडसूळ यांच्या घरी जाऊन राणा दाम्पत्यानं भेट घेतली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता अभिजीत अडसूळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभिजीत अडसूळ म्हणाले की, शेवटी ही प्रथा परंपरा आहे महाराष्ट्राची. कुणी पाहुणे आपल्या घरात आले तर नक्कीच आपण त्यांचे स्वागत करतो. आज नेमकं राम नवमीच्या पर्वावर रवीजी यांच्याकडून मेसेज आला की, आम्ही दोघं घरी येऊ इच्छितो. ते आमच्या घरी आले. आम्ही त्यांचे आदरातिथ्य केलं. राजकारणात कुणी कायमचा शत्रू नसतो किंवा मित्र नसतो.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, खासकरुन आज ही जी लढाई सुरु आहे ही देशाच्या पंतप्रधानांसाठी सगळीकडे चालू आहे. 400पारचा आकडा एका ठिकाणी धरलेला आहे. देशाचं नेतृत्व जे नरेंद्र मोदी साहेब करत आहेत. त्यांच्यासाठी सगळे लढण्यासाठी तयार होते. आम्ही नक्कीच सकारात्मक चर्चा करु. भूमिका अजून घ्यायची बाकी आहे. कार्यकर्ते आमचे सर्व प्रचारासाठी थांबले होते. परंतु आता आम्ही सर्व पदाधिकारी, जिल्ह्यातले सर्व महत्वाचे कार्यकर्ते आता आम्ही बसू. नक्कीच त्यामध्ये ठरवू. असे अभिजीत अडसूळ म्हणाले.