राज्यात अवकाळी पावसानं नुकसान केलं आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तर कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे स्वत: शेतीची पाहणी करत आहेत.
यावेळी माध्यमांशी बोलताना सत्तार यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवलं जाणार नाही. पीक विमा कंपन्या आणि माझी पाच वेळ बैठक झाली आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांना भरपाई मिळतेय. जे राहिले आहे त्यांनाही मिळेल. जे पीक खराब झाले त्याची नुकसान भरपाई मिळेल. असे सत्तार म्हणाले.
यासोबतच ते म्हणाले की, राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल कसा येईल माहीत नाही. अंतिम सुनावणी झाली आहे. कोर्ट जी ऑर्डर देईल ती सर्वांना मान्य करावी लागेल. आमच्या बाजूने आला तर वेल अँड गुड. नाही आला तर तोही निकाल मान्य करावा लागेल. असे सत्तार म्हणाले.