eknath shinde  team lokshahi
ताज्या बातम्या

"संभाजीनगर, धाराशीव नावांवर उद्या अधिकृत कॅबीनेट घेऊन शिक्कामोर्तब करणार"

अब्दुल सत्तार यांनी एकनाथ शिंदेंच्या कामाचं कौतूक केलं.

Published by : Sudhir Kakde

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून 40 आमदार घेऊन बंड केलं आणि भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं अन् मुख्यमंत्री झाले. त्यानंतर आता शिंदे यांच्यासोबत बंड करणाऱ्या अनेक आमदारांकडून एकनाथ शिंदे यांच्यासमोर शक्तीप्रदर्शन केलं जातंय. आज मुंबईत अब्दुल सत्तार यांच्या वतीने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील या कार्यक्रमात आपलं मनोगत व्यक्त केलं. महाविकास आघाडीचं (MVA Government) सरकार स्थापन झाल्यापासून अनेक लोक मला सांगत होते की, आपल्यासोबत घात होतोय. मात्र मी लोकांना सांगितलं की, आपल्या पक्षप्रमुखांनी घेतलेला निर्णय आपल्याला मान्य करावं लागेल.

आघाडीमध्ये राहून राज्यसभेत, विधानपरिषदेत पराभव स्विकारावा लागला. ज्यावेळी मी आमदारांना चला असं म्हटलं, त्यावेळी त्यांनी मला काहीच विचारलं नाही, फक्त पुढे चला म्हटलं. आम्हाला रोखण्याचा प्रयत्न झाला, मात्र आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आत्मपरिक्षण करणं सोडून, आम्हाला गद्दार, बंडखोर म्हणत होते. अडीच वर्ष आम्ही त्रास सहन केला असं मुख्यमंत्री म्हणाले. शेवटच्या कॅबीनेटमध्ये यांनी संभीजीनगर, उस्मानाबादची नावं बदलली. मात्र आता आम्ही उद्या अधिकृत कॅबीनेट घेऊन या नावावर शिक्कामोर्बत करणार आहोत अशी घोषणा यावेळी शिंदेंनी केली आहे.

सिल्लोड तालुक्याचे आमदार अब्दुल सत्तार हे देखील एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडामध्ये आघाडीवर होते. आज मुंबईमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना अब्दुल सत्तार यांनी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मदतीचा, कामाचा पाढा वाचत आमच्यावर मोठे उपकार केले असल्याचं सांगितलं. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी यावेळी सांगितलं की, कुठल्याही गोष्टीचा विचार न करता, फक्त एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर विश्वास ठेऊन आम्ही गेलो असं सत्तार म्हणाले. राज्यात, देशात आणि जगात कुठेही कधीही 50 आमदार बाहेर येऊन उठाव झाला नसेल, एवढा मोठा उठाव आम्ही केला असं म्हणाले. अब्दुल सत्तार यांनी सांगितलं की, मी आतापर्यंत जे मुख्यमंत्री पाहिले, ते लेना बँक होते, मात्र आता मी एकनाथ शिंदे यांच्या रुपाने देणा बँक आहेत असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी एकनाथ शिंदेंच्या कामाचं कौतूक केलं.

त्यानंतर शिंदेंनी सांगितलं की, सिल्लोडला आपण मोठा मेळावा करु असं मला सत्तार म्हणाले होते, तेव्हा ते म्हणाले की 50 हजार लोकं येतील. त्यातला एकही माणूस पावसात भीजणार नाही याची काळजी मी घेईल असं सत्तारांनी सांगितलं. सत्ता सोडून, ज्याच्याकडे काहीच नाही अशा एकनाथ शिंदेंसोबत हे लोक आले असं मुख्यमंत्री म्हणाले. भारताने नव्हे तर जगाने या घटनेची नोंद घेतली असं म्हणाले. इकडे लोक सांगत होते की, चाळीस आमदारांना पळवून नेलं वगैरे, मात्र तिकडे सर्व लोक गाणी म्हणत होते, एन्जॉय करत होते असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news