रवी जयस्वाल | जालना: राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी जालना येथए पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, त्यांना मिळालेली नुकसान भरपाई, ऑनलाईन ई पीक पाहणी या विषयांवर भाष्य केलं. तर, बोलताना त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांच्यावर टोलेबाजी केली आहे.
काय म्हणाले सत्तार?
"त्यावेळी राज्याच्या तिजोरीत खडखडाट कसा होता हे तर अजित दादांनाच माहित. राज्याच्या तिजोरीत खडखडाट नसून ती सर्वांसाठी भरलेली आहे" असं सत्तार यांनी म्हटलंय. त्याचबरोबर "राज्यात यंदा 27 लाख शेतकरी अतिवृष्टीमुळं बाधित झाले असून त्यांच्या खात्यावर 3 हजार 500 कोटी रुपयांची मदतही पोहोचली" अशी माहिती सत्तार यांनी दिली. दरम्यान ऑनलाईन ई-पीक पाहणीत बदल करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचंही सत्तार यांनी म्हटलंय.