ताज्या बातम्या

"फरार ललित मोदी सुष्मिता सेनला सापडला, मात्र PM मोदींना सापडेना"

दिल्लीतील उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित हे प्रकरण असून, लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांनी या प्रकरणी केंद्राला उच्चस्तरीय चौकशीची शिफारस केली आहे.

Published by : Sudhir Kakde

आम आदमी पक्षाचे (AAP) खासदार संजय सिंह यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. सुष्मिता सेनला ललित मोदी मिळाले पण आमच्या मोदीजींना ते सापडत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. याआधी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे निमंत्रक अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी आरोप केला होता की, केंद्राच्या आदेशानुसार सीबीआय लवकरच उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करणार आहे. दिल्लीतील उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित हे प्रकरण असून, लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांनी या प्रकरणी केंद्राला उच्चस्तरीय चौकशीची शिफारस केली आहे.

दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी दिल्लीतील उत्पादन शुल्क विभागात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत सीबीआय मार्फत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती. त्यावरून दिल्ली सरकार विरुद्ध केंद्र अशी लढाई आता नव्यानं सुरु झाली आहे. केंद्र सरकार मनीष सिसोदिया यांना लवकरच अटक करणार असल्याची शक्यता अरविंद केजरीवाल यांनी केंद्रावर आरोप करताना केले आहेत. केजरीवाल म्हणाले, सिसोदिया यांच्या विरोधात कोणतेही पुरावे सापडले नाहीत.

सुष्मिता सेनला ललित मोदी मिळाले, पण

आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, सुष्मिता सेन यांना ललित मोदी मिळाले. पण आपल्या मोदीजींना ते जमत नाहीये. ललित मोदींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर सुष्मिता सेनसोबतचे फोटो शेअर केले. ललित मोदींवर आयपीएलशी संबंधित निविदा आणि लिलावात अनियमिततेचे आरोप आहेत. बीसीसीआयने त्यांना बोर्डावरुन काढून टाकलं आहे. ईडी या प्रकरणाचा तपास करत असून ललित मोदी भारतातून पळून गेले आहेत. भारत सरकारने ललित मोदीला फरार घोषित केलं आहे.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result