निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यातच युट्युबर ध्रुव राठी याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. 'मिशन स्वराज' या नावाने ध्रुव राठीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. मिशन स्वराज, महाराष्ट्राला एक असं राज्य बनवले जाईल ज्याचे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराज पाहत होते. असे म्हणत त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
ध्रुव राठी याचा हा व्हिडिओ आदित्य ठाकरे यांनी ट्विट केला आहे. हा व्हिडिओ ट्विट करत आदित्य ठाकरे म्हणाले की, मिशन स्वराज्य: मविआ म्हणून नेमक्या ह्याच उद्दिष्टांच्या दिशेने आम्ही काम करत होतो, जो आत्ताच्या सत्ताधार्यांनी कपटाने थांबवला. हे आव्हान आम्ही स्वीकारतोच आहोत, कारण ते फक्त स्वीकारण्याजोग आव्हान आहे म्हणून नाही तर आम्हाला हीच चर्चा हवी होती म्हणून, कारण जे आपल्या महाराष्ट्राच्या हिताचं आहे, गरजेचं आहे, त्यावर चर्चा व्हायलाच हवी!
चला, महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांनो, हे पण करून दाखवूया! आव्हान स्विकारलं! 1.शेतकऱ्यांना मदत - प्रशिक्षण, माती चाचणी, बियाणे बँक, स्थानिक बाजारपेठा
2.पावसाच्या पाण्याचे संकलन (रेन वॉटर हार्वेस्टिंग)
3.मोफत उत्तम शिक्षण. मोफत उत्तम आरोग्यसेवा
4.शुद्ध हवा आणि पाणी
5.सर्व नागरिकांची सुरक्षितता
6.स्थानिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा (एमएसएमई) विकास
7.सर्वांसाठी रोजगार
‘मिशन स्वराज्य’असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी लोकांच्या मुद्यांवर काम करण्याचे आव्हान स्वीकारत असल्याचे या ट्विटमधून सांगितले आहे.