ताज्या बातम्या

गुजरातमध्ये भीषण अपघात! अहमदाबाद-बडोदा महामार्गावर बस-ट्रकच्या धडकेत 6 जण ठार

गुजरातमधील आणंदजवळ अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात घडला आहे.

Published by : Dhanshree Shintre

गुजरातमधील आणंदजवळ अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात घडला आहे. ट्रक आणि बसमध्ये जोरदार धडक झालेली आहे. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 8 जण गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. या जखमींवर उपचार सुरु आहे. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांची आकडा वाढण्याची शक्यता आहे. हा अपघात आनंद जिल्ह्यातील चिखोदरा गावाजवळ पहाटे 4:30 च्या सुमारास घडला.

या अपघाताचा बळी ठरलेली ही लक्झरी बस महाराष्ट्रातून राजस्थानला जात होती. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना आणंद जिल्ह्यातील विविध रुग्णालयात दाखल केले. तर इतर जखमींचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानला जाणाऱ्या बसचा टायर पंक्चर झाल्याने महामार्गाच्या बाजूला उभी होती. बस चालक, क्लिनर आणि प्रवासी बसखाली उभे असताना त्यांना मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश