कमलाकर बिरादार, नांदेड
पंढरपूर यात्रेसाठी नांदेड विभागातून विशेष बस धावणार असल्याची माहिती मिळत आहे. पंढरपूरची आषाढी यात्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी नांदेड परिवहन विभागाने 230 विशेष बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
13 जुलै ते 22 जुलैपर्यंत नांदेड ते पंढरपूर विशेष बसेस धावणार आहे. परिवहन विभागाने तयारी पूर्ण केली आहे.यासाठी कर्मचाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.
एका गावातून 40 प्रवाशी मिळाल्यास त्या प्रवाशांसाठी देखील बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती नांदेड परिवहन विभागाचे विभागीय नियंत्रक चंद्रकांत वडस्कर यांनी दिली आहे.