कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. चीन सह इतर काही देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा मोठ्याप्रमाणात वाढला आहे. चीन, ब्राझीलमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. त्यामुळे देशात कोरोनासंदर्भात नव्या गाईडलाईन्स किंवा खबरदारीचे उपाय जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोरोनाचं उगम स्थान मानलं जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. काही महिन्यांपूर्वी दैनंदिन कोरोना रुग्णांचा आकडा लाखांवर पोहोचला होता. आतापर्यंत देशात 4 कोटी 46 लाख 76 हजार 199 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
यातच कोरोनाचा BF 7 प्रकार आता भारतातही दाखल झाला आहेत. गुजरातमधील वडोदरा येथील एका अनिवासी भारतीय महिलेमध्ये कोविड 19 च्या BF7 हा व्हेरिएंट आढळून आला आहे. गुजरातमध्ये कोरोनाची आणखी दोन प्रकरणे समोर आली आहेत. भारतातील BF.7 प्रकाराचे 4 रुग्ण आढळून आली आहेत. याची माहिती NITI आयोगाचे VK पॉल यांनी दिली.