पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. गोरेगाव ते बोरीवली स्थानकादरम्यान रेल्वेचा जम्बो ब्लॉक , सिग्नल आणि ओव्हरहेड वायर्सच्या दुरुस्तीसाठी धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. धीम्या मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. काही बोरिवली लोकल गोरेगावपर्यंतच चालवण्यात येणार आहेत, काही फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत, तर काही विलंबाने धावणार आहे.
जलद मार्गावर घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे फेऱ्या बोरिवली-गोरेगाव आणि अंधेरी स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या पाच तासांच्या ब्लॉक कालावधीत रेल्वे रूळ देखभाल-दुरुस्तीसंबंधी कामे करण्यात येणार आहेत.
जोगेश्वरी स्थानकात रूट रिले इंटरलॉकिंगच्या कामासाठी ४ आणि ५ फेब्रुवारीला पाचव्या मार्गिकेवर रात्री १०.३० ते पहाटे ४.३०पर्यंत आणि अप-डाऊन जलद मार्गिकेवर रात्री १२.१५ ते पहाटे ०४.१५पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.