अमोल धर्माधिकारी, पुणे
पुण्यातील बाणेर गणराज चौकाजवळ शाळेतून घरी जाणाऱ्या 9 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात बांधकामांवरील सळई पडून झालेल्या अपघातातील बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बाणेर येथे गणराज चौका जवळ मुख्य रस्त्यावर केतन वीरा बिल्डरचे बांधकाम सुरू आहे. तिथे हा अपघात घडला होता.
बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान बिल्डिंगवरून सळई मुख्य रस्त्यावर पडली. ही सळई शाळेतून घरी जाणाऱ्या रुद्र केतन राऊत (वय-९) रा. विरभद्र नगर बाणेर याच्या डोक्यात पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावरती जुपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.