आमदार सुहास कांदेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुहास कांदे यांनी मराठा समाजाचे नेते शेखर पगार आणि समीर भुजबळ यांचे समन्वयक विनोद शेलार यांना शिवीगाळ केली होती.
या प्रकरणी विनोद शेलार, शेखर पगार यांनी काल रात्री विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.