ताज्या बातम्या

Sanjay Pandey : माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंविरोधात गुन्हा दाखल

माजी पोलीस अधिकारी संजय पांडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

माजी पोलीस अधिकारी संजय पांडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय पांडेंसह 7 जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खंडणीसाठी धमकी देणे, न्यायालयाची दिशाभूल करणे, नकली दस्तऐवज बनवणे आदी कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. व्यापारी संजय पुनामिया यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा झाला आहे.

व्यापारी संजय पुनामिया यांनी सांगितले की, मे २०२१ ते ३० जून २०२४ या कालावधीत त्यांनी आपला छळ केला. तसेच या सगळ्यांनी मिळून ठाणेनगर पोलिस स्टेशनमध्ये २०१६ मध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्याचा बेकायदेशीर तपास केला. त्याचबरोबर मला आणि इतर व्यावसायिकांना छोटया केसेसच्या धमक्या दिल्या, पैसे उकळले आणि विशेष सरकारी वकील म्हणून खोटे दस्तऐवज तयार करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. असे ते म्हणाले.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result