ताज्या बातम्या

मासा गिळल्याने 6 महिन्याच्या बाळाचा मृत्यू

घशात मासा अडकून अवघ्या ६ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

घशात मासा अडकून अवघ्या ६ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. मासा घशात अडकून श्वास अडकल्याने बाळाचा तडफडून मृत्यू झालाय. अंबरनाथच्या उलन चाळ परिसरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सरफराज अन्सारी हे त्यांच्या कुटुंबासह अंबरनाथ पश्चिमेच्या उलन चाळ परिसरात राहतात. त्यांना शहबाज नावाचा 6 महिन्यांचा मुलगा होता. गुरुवारी रात्री शहबाज घराबाहेर इतर लहान मुलांसोबत खेळत होता. तेवढ्या खेळता खेळता तो अचानक रडू लागला. शहबाजची आई आणि वडिलांनी शहबाज खेळत असलेल्या ठिकाणी धाव घेतली. काही केल्यानं शहबाज शांतच होईना. शहबाजच्या आई-वडिलांनी त्याला घेऊन उल्हासनगरचं शासकीय मध्यवर्ती रुग्णालय गाठलं. मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच शहबाज याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

वेळी त्याच्या घशात मासा अडकल्याचं आणि त्यामुळे त्याचा श्वास रोखला जाऊन त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. या बाळाचं शवविच्छेदन करून त्याच्या मृत्यूचे नेमकं कारण शोधून काढलं जाणार असल्याची माहिती दिली आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी