थोडक्यात
धुळ्यात 70 लाखांची रोकड जप्त
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर सांगवी पोलिसांची कारवाई
मध्य प्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या कारमधून रोकड जप्त
विशाल ठाकूर, धुळे
धुळ्यात 70 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर सांगवी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मध्य प्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या कारमधून ही रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर रोकड आढळून आल्याने खळबळ उडाली असून रोकडसह वाहन पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे पैसे नेमके कुणाचे याचा तपास सुरू आहे.