Central Railway Latest News Google
ताज्या बातम्या

प्रवाशांचे होणार हाल! मध्य रेल्वे घेणार ६ दिवसांचा मेगाब्लॉक, पुण्याकडे जाणाऱ्या 'इतक्या' रेल्वेगाड्या होणार रद्द

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडून एक महत्त्वाची अपडेट जाहीर करण्यात आली आहे.

Published by : Naresh Shende

Central Railway Megablock : मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडून एक महत्त्वाची अपडेट जाहीर करण्यात आली आहे. मध्ये रेल्वेच्या पुणे विभागात सहा दिवसांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. दौंड रेल्वे स्थानकातील विविध कामांसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. २७ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान हा ब्लॉक असणार आहे. या काळात अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. तर काही रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलले जाणार आहेत.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या या सहा दिवसांच्या ब्लॉकमुळे पुणे विभागातील १९ रेल्वेगाड्या रद्द करण्यात येतील. तर २२ एक्स्प्रेसचे मार्गही बदलले जातील. यादरम्यान सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस 3 दिवसांसाठी रद्द करण्यात येणार आहे. ही ट्रेन 3 दिवस रद्द केल्याने प्रवाशांची तारांबळ उडणार आहे.

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news