ताज्या बातम्या

आज दसरा मेळावा; शिंदे गटाच्या 'या' 51 फुटी तलवारीची जोरदार चर्चा

आज दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

आज दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. या दसरा मेळाव्यात एकमेकांवर जोरदार आरोप - प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. दोन्ही गटांचे मेळावे सायंकाळीच होणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेचा वार्षिक दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानात होईल. शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्रे- कुर्ला संकुलात होणार आहे.

या दसऱ्या मेळाव्याला मुंबईबाहेरून अधिक गर्दी होण्याची चिन्हे आहेत. BKC येथील शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या ठिकाणी 51 फुटी तलावर ठेवण्यात आली आहे. ही चांदीची तलवार उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या तलवारीचे शस्त्रपूजन करण्यात येणार आहे.

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने वांद्रे-कुर्ला संकुलात जोरदार तयारी केली असून, राज्यभरातून चार-पाच हजार एसटी, खासगी बसगाडया आणि हजारो खासगी वाहनांतून कार्यकर्ते मुंबईत येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांनी सांगितले की, ‘‘मेळाव्यासाठी आमची जय्यत तयारी असून, हजारो कार्यकर्ते मैदानात व बाहेरही असतील. राज्यभरातून कार्यकर्ते निघण्यास सुरूवात झाली असून, त्यांचा नवी मुंबई व चेंबूरमध्ये मुक्काम आहे. आम्हाला वाहनांची किंवा बसगाडय़ांची व्यवस्था करावी लागली नाही. कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने येत आहेत’’, असे त्यांनी सांगितले.

Latest Marathi News Updates live: सरकार स्थापनेबाबत दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत आज चर्चा होणार

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू; विविध विधेयकांवर होणार निर्णय

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर; मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार?

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड