ताज्या बातम्या

आजपासून ठाणे शहरात 5 टक्के पाणीकपात तर 'या' तारखेपासून होणार 10 टक्के पाणीकपात

आजपासून ठाणे शहरात 5 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

आजपासून ठाणे शहरात 5 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात ५ टक्के कपात करण्यात येणार आहे. ठाणे शहरातील काही भागात पाच टक्के पाणी कपात लागू झाली आहे. तर या पाणी कपातीचे प्रमाण 5 जूनपासून 10 टक्के असल्याची माहिती मिळत आहे.

जलाशयांमधील पाणीसाठा अधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून पाणी पुरवठ्यात 5 टक्के कपात करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. त्यामुळे ठाणेकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

शिवशक्ती नगर, करवालो नगर, अंबिका नगर, ज्ञानेश्वर नगर, जय भवानी नगर, काजुवाडी, जिजामाता नगर, बाळकुम पाडा नं १, नौपाडा, पाचपाखाडी, हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथ नगर, नामदेव वाडी, साईनाथ नगर, रामचंद्र नगर 1. किसन नगर नं १, किसन नगर नं २, शिवाजी नगर, पडवळ नगर, जनता झोपडपट्टी, लक्ष्मी नगर, आंबेडकर नगर, मानपाडा (नळपाडा), कोपरी धोबीघाट, गावदेवी (लुईसवाडी) जलकुंभ, टेकडी बंगला जलकुंभ, भटवाडी, इंदिरानगर, आनंद नगर, गांधी नगर, कोपरी कन्हैया नगर या परिसरात या भागात 5 टक्के पाणीकपात असणार असून 5 जूननंतर 10 टक्के पाणीकपात केली जाणार आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी