राज्यातील 305 बाजार समित्या आज बंद राहणार आहेत. लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या आज बंद ठेवण्यात येणार आहेत. विविध मागण्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार आहेत.
पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय परिषदेत मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
बंदमुळे बाजार समित्यांधील कोट्यवधींचं व्यवहार ठप्प असल्याचे पाहायला मिळत असून नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या आज बंद राहणार आहेत.
मंत्री अब्दुल सत्तारांच्या निषेधार्थ बंदचा निर्णय घेण्यात आला असून मंत्री सत्तार यांनी म्हणणं ऐकून न घेतल्याचा व्यापाऱ्यांकडून आरोप करण्यात येत आहे. राज्यातील बाजार समित्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे.