28 people have died and 60 others became ill from drinking altered liquor Team Lokshahi
ताज्या बातम्या

दारु बंदी असलेल्या गुजरातेत गावठी दारूमुळे 28 जणांचा मृत्यू

खून आणि इतर गुन्ह्यांच्या आरोपाखाली 14 लोकांविरुद्ध तीन एफआयआर नोंदवण्यात आले असून त्यापैकी बहुतेकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

Published by : Sudhir Kakde

अहमदाबाद : गुजरातमधील बोताड जिल्ह्यात कथितरित्या बनावट दारु सेवनामुळे अनेकांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा आता 28 वर पोहोचला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. गुजरातचे पोलीस महासंचालक आशिष भाटिया यांनी गांधीनगरमध्ये पत्रकारांना सांगितलं की, ही दारू अत्यंत विषारी मिथाइल अल्कोहोलपासून बनवण्यात आली होती. ते म्हणाले खून आणि इतर गुन्ह्यांच्या आरोपाखाली 14 लोकांविरुद्ध तीन एफआयआर नोंदवण्यात आले असून त्यापैकी बहुतेकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ही बाब सोमवारी सकाळी उघडकीस आली. बोताडच्या रोझीद गावासह अन्य काही ठिकाणी राहणाऱ्या काही लोकांची प्रकृती खालावल्यानं त्यांना बरवाला परिसर आणि बोताड शहरातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. (28 people have died and 60 others became ill from drinking altered liquor)

भाटिया यांनी सांगितलं की, बनावट दारूच्या सेवनामुळे आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 22 बोताड जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातील, तर सहा शेजारील अहमदाबाद जिल्ह्यातील होते. याशिवाय 45 हून अधिक लोक सध्या भावनगर, बोताड आणि अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल आहेत. भाटिया म्हणाले, "फॉरेन्सिक विभागाकडून असं सांगण्यात आलं आहे की, पीडितांनी मिथाइल अल्कोहोलचं सेवन केलं होतं." गुजरात दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि अहमदाबाद गुन्हे शाखा देखील या प्रकरणाचा तपास करत आहे.

दरम्यान, गुजरातच्या दौऱ्यावर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी राज्यात दारूबंदी लागू असूनही अवैध दारूची विक्री होत असल्याचा आरोप केला. या वर्षाच्या अखेरीस राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे यासह अनेक मुद्दे विरोधकांसाठी आयतं कोलित ठरणार आहेत.

IPL Mega Auction 2025 Live: राजस्थान रॉयल्सचा स्टार खेळाडू देवदत्त पडिक्कल अन्सोल्डवर!

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत