जळगावमध्ये शेतकऱ्याचा 25 टन कांदा सडला असल्याची माहिती मिळत आहे. भडगाव तालुका शेतकी संघाचे संचालक गोविंद एकनाथ माळी यांनी यावर्षी उन्हाळी कांद्याचे विक्रमी उत्पादन घेतले होते. मात्र कांदा काढण्याच्यावेळी त्याला कवडीमोल भाव असल्यामुळे त्यांनी तो साठवला.
त्या शेतकऱ्याने शेतातील चाळीत तो कांदा साठवून ठेवला. 25 ते 30 टन कांदा त्यांनी चाळीमध्ये भरून ठेवला होता. मात्र त्या साठवून ठेवलेल्या कांद्यावर अज्ञाताने रासायनिक खत टाकले. त्यामुळे एका चाळीतील कांदा पूर्णपणे सडून गेला असून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्याने भडगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.