चंद्रशेखर भांगे, पुणे
पुणे पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील कुंरकुंभ येथे असलेलं ड्रग्जची फॅक्टरी उध्वस्त केल्यानंतर याचे धागेद्वारे आता थेट लंडनपर्यंत पोहचल्याचे पाहायला मिळत आहेत संदीप यादवने कुरकुंभ येथे तयार होत असलेले ड्रग्स थेट लंडनला कुरिअर मार्फत पाठवल्याची माहिती समोर आली आहे.
ससून रुग्णालयातून ड्रग्सचं रॅकेट चालवणारा ललित पाटील याच्यावर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आता कुरकुंभ वरून थेट लंडनपर्यंत ड्रग्स पोहोचवले जात आहेत. ललित पाटील हा सध्या कारागृहात असून त्याचा सहकारी संदीप दुनिया उर्फ धुणे हा विदेशात नेपाळ मार्गे पळून गेल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांना एक हजार 337 कोटी 60 लाखाचे ड्रग्ज हाती लागले असल्याची माहिती समोर येत असून याचा तपास आता एनसीबी करत असून या प्रकरणात अजून माहिती समोर येण्याची शक्यता आहे. हे पुण्यात तयार होणारे ड्रग्स मुंबई, सांगली, पश्चिम बंगाल, दिल्ली वाया लंडनला गेल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पुण्यातून तब्बल 218 किलो ड्रग्ज लंडनला पाठवले