म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मुंबई शहर बेटावरील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे पावसाळ्यापूर्वी नियमित सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात २० इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. या इमारतींमध्ये गतवर्षी घोषित केलेल्या चार इमारतींचा समावेशही आहे. सुरक्षेच्या नियमांचे रहिवाशांनी पालन करावे, असं आवाहन म्हाडाकडून करण्यात आलं आहे.
यावर्षी जाहीर केलेल्या २० अतिधोकादायक इमारतींची यादी खालीलप्रमाणे
१) इमारत क्रमांक ४-४ ए,नवरोजी हिल रोड क्र. १, जॉली चेंबर ( मागील वर्षीच्या यादीतील)
२) इमारत क्रमांक ५७ निझाम स्ट्रीट
३) इमारत क्रमांक ६७, मस्जिद स्ट्रीट
४) इमारत क्रमांक ५२–५८, बाबु गेणु रोड,
५) इमारत क्रमांक ७ खंडेराव वाडी/ २०४–२०८, काळबादेवी रोड
६) इमारत क्रमांक ५२ -५२ अ, २ री डेक्कन क्रॉस रोड
७) इमारत क्रमांक १२५–१२७ए, जमना निवास, खाडीलकर रोड,गिरगांव
८) इमारत क्रमांक ३१४ बी, ब्रम्हांड को ऑप हौ सोसायटी, व्ही पी.रोड,गिरगाव
९) इमारत क्रमांक ४१८–४२६ एस.व्ही.पी रोड,(१२४ ते १३४ए ) गोलेचा हाऊस,
१०) इमारत क्रमांक ८३ – ८७ रावते इमारत, जे.एस.एस.रोड,गिरगांव
११) इमारत क्रमांक २१३–२१५ डॉ.डी.बी.मार्ग,
१२) इमारत क्रमांक ३८–४० स्लेटर रोड
१३) ९ डी चुनाम लेन,
१४) ४४ इ नौशीर भरुचा मार्ग,
१५) १ खेतवाडी १२ वी लेन,
१६) ३१सी व ३३ए ,आर रांगणेकर मार्ग व १९ पुरंदरे मार्ग , गिरगाव चौपाटी ( मागील वर्षीच्या यादीतील) १७) इमारत क्रमांक १०४-१०६ ,मेघजी बिल्डिंग, अ , ब व क विंग , शिवदास चापसी मार्ग ( मागील वर्षीच्या यादीतील)
१८) इमारत क्रमांक ५५-५९–६१–६३–६५ सोफीया झुबेर मार्ग,
19) इमारत क्र. ४४-४८, ३३-३७ व ९-१२ कामाठीपुरा ११ वी व १२ वी गल्ली, देवल बिल्डींग,
20) अंतिम भूखंड क्र. ७२१ व ७२४ टीपीएस - ३ विभाग, इमारत क्रमांक ४० बी व ४२८, उपकर क्र ग उत्तर ५०-९५ (१) आणि ग उत्तर -५१०३ आत्माराम बिल्डिंग व पेनकर चाळ (गतवर्षीच्या यादीतील)