हिमाचल प्रदेशातील बीर बिलिंग येथे सहलीदरम्यान दोन ट्रेकर्सचा मृत्यू झाला. दोन दिवस, त्यांच्यासोबत आलेला जर्मन शेफर्ड कुत्रा मृतदेहाशेजारी राहिला आणि बेपत्ता झाल्यानंतर सुमारे 48 तासांनी मंगळवारी ते सापडेपर्यंत भुंकत राहिला.
पंजाबमधील पठाणकोट येथील अभिनंदन गुप्ता (30) आणि प्रणिता वाला (26) अशी मृत ट्रेकर्सची नावे आहेत. पडल्यानंतर दोघांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले असून पोस्टमार्टमद्वारे मृत्यूच्या कारणाची पुष्टी होईल.
5000 फूट उंचीवर असलेले बीर बिलिंग हे ट्रेक आणि पॅराग्लायडिंगसाठी एक आवडते ठिकाण आहे. कांगडा जिल्ह्याचे पोलिस प्रमुख वीर बहादूर म्हणाले की, गुप्ता गेल्या चार वर्षांपासून पॅराग्लायडिंग आणि ट्रेकिंगसाठी या भागात राहत होता. त्यांनी सांगितले की, ही महिला काही दिवसांपूर्वी पुण्याहून आली होती. प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की, चार लोकांचा एक गट होता. त्यापैकी दोन महिला, एका कारमध्ये बसून निघाल्या होत्या. जेव्हा कार एका पॉईंटच्या पुढे जाऊ शकली नाही तेव्हा त्यांनी चालण्यास सुरुवात केली. हवामान बदलल्याने गटातील दोन लोक मागे निघून गेले आणि तिथल्या इतरांच्या मदतीने ते सुरक्षितपणे परतले. पण गुप्ता यांनी सांगितले की, त्याला रस्ता माहीत आहे आणि तो, प्रणिता आणि कुत्रा त्यांच्या मार्गाने निघाला.
गुप्ता आणि प्रणिता बराच वेळ परत न आल्याने गटातील इतरांनी त्यांची हरवल्याची तक्रार नोंदवली होती. काही वेळातच त्यांच्या शोधासाठी सर्च युनिट पाठवण्यात आलं. बचाव पथकातील एका सदस्याने सांगितले की, पॅराग्लायडर्स जेथून टेक ऑफ करतात तिथून तीन किलोमीटर खाली मृतदेह सापडले. "हा एक उंच भाग असून बर्फवृष्टीदरम्यान खूप निसरडा होतो, ते घसरुन पडले, आणि एकदा उठण्यात यशस्वी झाले. परंतु पुन्हा घसरले असे अधिकाऱ्याकडून कळाले. जर्मन शेफर्ड मृतदेहाशेजारी भुंकत आणि रडत राहिला. शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.