पुणे हिट अँड रन प्रकरणातील आणखी एक बातमी समोर आली आहे. आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयाच्या डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर या 2 डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.
अपघातादरम्यान अल्पवयीन मुलानं मद्यप्राशन केलं होतं की नाही, हे तपासण्यासाठी नऊ तासांच्या दिरंगाईनंतर पोलिसांनी ससून रुग्णालयात त्याची ब्लड टेस्ट केली होती. परंतु, या चाचणीत मुलगा दोषी आढळू नये, यासाठी ससून रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनीच त्याच्या रक्ताच्या नमुन्याची फेरफार केल्याचा प्रकार समोर आला. काल दुपारी पुणे पोलिसांच्या हाती हे रिपोर्ट लागले मात्र त्यात फेरफार झाल्याचे लक्षात येताच पोलिसांनी पुढील कारवाई केली. आज पहाटे त्यांच्या घरी जाऊन गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना अटक केली.
अजय तावरे ससूनच्या फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख आहेत. ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी श्रीहरी हळनोर याला तीन लाख रुपये मिळाले असल्याची माहिती आहे. पुणे पोलीस ससून रुग्णालयातील CCTV तपासणार. तसेच ब्लड रिपोर्ट बनवतानाचे फुटेज चेक करणार आहेत.