जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी 18 लाख कर्मचारी आजपासून संपावर जाणार आहेत. या संपात राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र, राज्य सरकारी- निमसरकारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र या संघटना सहभागी आहेत.
सोमवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक महत्वाची बैठक पार पडली. मात्र तोडगा निघालाच नाही त्यामुळे आता त्या सर्वांनी संपाची घोषणा केली आहे. राज्यभरातील तब्बल 18 लाख कर्मचारी संपावर आहेत.
जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा व शासकीय कामकाज न थांबवता योग्य मार्गाने आपल्या मागण्या शासनापुढे मांडाव्यात, असे आवाहन शासनाने केले आहे.