औरंगाबाद येथे 1मे रोजी होणाऱ्या मनसेच्या सभेला आता परवानगी मिळाली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुणे येथे हनुमान जयंतीचे औचित्य साधून महाआरती केल्यांनंतर दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेत औरंगाबादच्या या सभेची घोषणा केली होती. तेव्हापासूनच या सभेची मोठी चर्चा सुरु आहे. मात्र, पोलीस या सभेला परवानगी देणार की नाही असा सवाल निर्माण झालेला होता. अखेर आज पोलिसांनी या सभेला परवानगी दिली आहे. परंतु, ही परवानगी देताना पोलिसांनी आयोजकांना अर्थात मनसेला 16 अटी घातल्या आहेत.
ह्या आहेत पोलिसांनी घातलेल्या 16 अटी:
सभा संध्याकाळी 4.30 ते रात्री 09.45 वेळेतच आयोजित करावी, कार्यक्रमात कोणताही बदल करु नये
वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म यावरुन चिथावणी देणारं विधान करु नये
सभेत कुणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करु नये
सभेसाठी पोलिसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करावा, निर्धारित ठिकाणीच पार्किंग करावं
कार्यक्रमादरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगू नये किंवा प्रदर्शनही करु नये
अट 2, 3 आणि 4 बाबत सभेत सहभागी होणाऱ्यांना आयोजकांनी कळवावे
सभेतील स्वयंसेवकांची नावे, मोबाईल नंबर तसेच बाहेरुन येणाऱ्यांची अंदाजित संख्या एक दिवस अगोदर पोलिसांना कळवावी
सभेसाठी 15 हजारहून अधिक लोकांना निमंत्रिक करु नये, काही गोंधळ झाल्यास आयोजक जबाबदार राहतील
सभास्थानी सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी निर्देशित केलेल्या जागी बॅरिकेट्स उभारावे
सभेसाठी आवाजाची मर्यादा 75 डेसिबल इतकी ठेवावी लागणार