राज्यात नव्याने स्थापन झालेली परिवर्तन महाशक्तीची पुण्यात आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी हे उपस्थितीत होते. या बैठकीत 150 जागाबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे असो की देवेंद्र फडणीस यांच्या विरोधात देखील उमेदवार देणार असल्याची महत्त्वाची दिली. तसचं बरेच लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक असल्याचही त्यांनी सांगितलं.
सामान्य माणसाला आपलं वाटेल असं सरकार आम्ही स्थापन करण्याचा प्रयत्न करु, तसचं आम्ही चांगले उमेदवार देणार असल्याचही बच्चू कडू म्हणाले.शरद पवारांना प्रश्न विचारत म्हणाले,पवारसाहेब म्हणतात परिवर्तन आणू, तुम्ही कसलं परिवर्तन आणणार आहात? तुम्ही इतके दिवस सत्तेत होते, मग आता कसं काय परिवर्तन तुम्ही करणार? परिवर्तनाचा अधिकारी युतीलाही नाही आणि आघाडीलाही नाही. परिवर्तनाची भाषा करण्याचा अधिकार आम्हाला असल्याचे कडू म्हणाले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्याशी देखील आमचं बोलणं सुरु आहे. ते आमच्या सोबत येतील असे प्रयत्न सुरु आहे.तसेच महादेव जानकर देखील आमच्यासोबत येतील असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आहे.