ताज्या बातम्या

Nepal Bus Accident: नेपाळमध्ये बस नदीत कोसळून 14 जणांचा मृत्यू; पोलिसांकडून बचावकार्य सुरु

नेपाळला पर्यटनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील बसचा भीषण अपघात झाला आहे.

Published by : Dhanshree Shintre

नेपाळला पर्यटनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील बसचा भीषण अपघात झाला आहे. महाराष्ट्रातील यात्रेकरूंची बस नेपाळमध्ये नदीत कोसळून 14 जण ठार झाल्याची माहिती आहे. बसमध्ये एकूण 40 जण होते. ही बस पोखराहून काठमांडूला जात होती. मृतांमध्ये महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. अंदाजे 15 ते 16 मृतदेह सापडले असल्याचेही सांगण्यात आले आहे.

नेपाळच्या सशस्त्र पोलीस दलासह नेपाळ आपत्ती व्यवस्थापनाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) माधव पौडेल यांच्या नेतृत्वाखाली 45 पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकासह अपघातस्थळी बचावकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय प्रवासी पोखरा येथील माझेरी रिसॉर्टमध्ये थांबले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी पोखराहून काठमांडूसाठी निघाले मात्र या प्रवासात अपघात झाला.

देव दर्शन करण्यासाठी महराष्ट्रातील भाविक गेले होते. 110 जणांच्या ग्रुपने गोरखपूरवरुन तीन बस केल्या होत्या. त्यामधील एक बस मुखलिसपूरजवळ नदीत कोसळली. त्यामध्ये अनेक कुटुंब होती. आई-वडील-मुलं असे सह परिवार ते पर्यटनाला निघाले होते. त्याचवेळी काळाने घाला गेला.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी