प्रशांत जव्हेरी| नंदुरबार: नंदुरबार शहरातील अंधारे चौकात एका खाजगी ट्रॅव्हल्समधून ११ तलवारी जप्त करण्यात आल्या असून याप्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या अंतर्गत करण्यात याणार आली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नंदूरबार (Nandurbar) शहरातील अंधारे हॉस्पिटल परिसरातुन एका खाजगी ट्रॅव्हल्समधुन 9 मोठ्या व 2 लहान अशा एकुण 11 तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. या तलवारींची किंमत 6 हजार 600 रुपये सांगितले जात आहे.
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने सदर कारवाई केली असून ११ तलवारींपैकी नंदुरबारला ३ तळोदा व अक्कलकुवा शहरात प्रत्येकी १ तलवार नेली जाणार होती. पोलीस कॉन्स्टेबल आनंदा मराठे यांच्या फिर्यादीवरुन ईश्वर सोनार, खुशाल हिरणवाळे या दोघांविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४ चे उल्लंघन २५ सह मुंबई पोलीस कायदा कलम ३७ चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास एपीआय (API) मोहिते करीत आहेत.