ठाणे शहरात पाणीपुरवठ्यात 10 टक्के कपात करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जलाशयातील पाणीसाठ्यात घट झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पालिकेकडून 10 टक्के पाणीकपात करण्यात आली आहे.
मुंबई पालिकेकडून ठाणे शहराला 85 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. त्यामुळे आता ठाण्यातील काही भागात पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहनही महापालिकेने केले आहे.