Covid-19 updates

Coronavirus चा नवा वेरिएंट; ११ देशांतील शिरकावानंतर भारतात दहशत

Published by : Lokshahi News

जगभरात कोरोना लसीकरणाला वेग आला असताना, आता 11 देशांमध्ये कोरोनाचा नवीन वेरिएंट आढळून आला आहे. या नव्या वेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण डेन्मार्कमध्ये आढळले आहेत. दरम्यान या नवीन स्ट्रेनचे रुग्ण भारतात आढळल्याची माहिती मंगळवारी केंद्र सरकारने दिली आहे.

संशोधकांच्या माहितीनुसार, ब्रिटन, अमेरिका, नायजेरिया, डेन्मार्क, फ्रान्स, बेल्जियम, स्पेन, कॅनडा, ऑस्ट्रेलिय, घाना आणि जॉर्डन या अकरा देशांमध्ये 'बी.१.५२५' हा वेरिएंट आढळला आहे. यामध्ये सर्वाधिक डेन्मार्कमध्ये ३५ प्रकरणे समोर आली आहेत. तर, ब्रिटनमध्ये ३३, नायजेरियात १२, अमेरिकेत १० आणि फ्रान्समध्ये पाच रुग्ण आढळले असल्याची पुष्टी करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे कोरोनाचा हा नवा वेरिएंट दक्षिण आफ्रिका, ब्राझीलमध्ये आढळलेल्या वेरिएंटप्रमाणे असल्याचे समजते. या संदर्भात केंद्र सरकारने मंगळवारी सांगितले की, जानेवारीमध्ये भारतात चार जणांना दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या वेरिएंटची लागण झाली आहे. तर, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ब्राझीलमध्ये आढळलेल्या वेरिएंटची लागण एका व्यक्तीला झाल्याचे समजते.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती