पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेच्या नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये वर्ग केले. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हा 9 वा हप्ता असेल. यावेळी सुमारे 9 कोटी 75 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 19 हजार 500 कोटी रुपये पाठवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधतील. योजनेचा नववा हप्ता आज जारी करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान सन्मान योजना जाहीर केली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरली होती. तेव्हापासून शेतकऱ्यांच्या खात्यात 8 हप्त्यांमध्ये पीएम किसान योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे.