नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Deepak Pandey) यांनी आपल्या बदलीसाठी गृहखात्याकडे अर्ज केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. नाशिक (Nashik) शहरात गेल्या काही दिवसांपसून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे, त्यामुळे त्यांच्यावर नाशिककर नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहे. त्यामुळे त्यांनी स्वत:च गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी हा अर्ज केला असून हा अर्ज गृहखात्याला मिळाल्याचं समजतंय. नाशिकचे पोलीस आयुक्त पांडेय हे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर त्यांनी गुन्हा त्यांनी दाखल केला होता.
नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर 'चौकशीसाठी पोलीस ठाण्यात यावेच लागेल' असा पावित्रा घेतल्याने ते प्रकाशझोतात आले होते. त्यानंतर राणेंनी ऑनलाईन स्वरूपात जबाबदेखील नोंदवला होता. आयुक्तांच्या या निर्णयामुळेच त्यांच्यावर बदलीची टांगती तलवार असल्याची चर्चा होती. शहरातील गुन्हेगारीत झालेली वाढ आटोक्यात आणणं सोडून पोलीस आयुक्त हेल्मेटसक्तीच्या मागे लागलेत, अशीही टीका अनेक राजकारणी आणि नाशिककर पोलीस आयुक्त यांच्यावर करत होत आहे.
याच पार्श्वभूमीवर हा त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं समजतंय. त्यामुळे आता नेमकी काय माहिती समोर येणार आणि ते काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.