Uttar Maharashtra

नाशिक पोलीस आयुक्तांचा ‘तो’ निर्णय; पेट्रोल पंप चालकांनी दिला गुढीपाडव्याला आंदोलनाचा इशारा, प्रकरण काय ?

Published by : left

किरण नाईक | नाशिकमधील वाढत्या अपघाताच्या घटना लक्षात घेता पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Police Commissioner Deepak Pandey) यांनी पुन्हा एकदा हेल्मेट सक्ती तीव्र करत विनाहेल्मेट पेट्रोल दिल्यास पेट्रोल पंप चालकांवर (Petrol Pump owner) आत्महत्येस प्रवृत्त (Suicide) केल्याचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेलफेअर असोसिएशन निषेध केला असून 2 एप्रिल गुढीपाडव्याला पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सध्या पोलिस आयुक्त विरूद्ध पेट्रोल पंप चालक असा संघर्ष सूरू आहे.

शिस्तप्रिय आणि नियमांना धरुन चालणारे अधिकारी म्हणून नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची ओळख आहे. नाशिकच्या पोलीस आयुक्तपदाचा कारभार हाती घेतल्यापासून त्यांनी हेल्मेट सक्ती मोहीम राबवण्यास सुरुवात केली. त्यानुसार नाशिकमधील वाढत्या अपघाताच्या घटना लक्षात घेता पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Police Commissioner Deepak Pandey) यांनी विनाहेल्मेट वाहन धारकांना पेट्रोल दिल्यास पेट्रोल पंप चालकांवर (Petrol Pump owner) आता आत्महत्येस प्रवृत्त (Suicide) केल्याचा गुन्हा दाखल होणार असल्याचा निर्णय घेतला होता.

दीपक पांडेय (Police Commissioner Deepak Pandey) यांनी घेतलेल्या या निर्णयाविरोधात आता पेट्रोल पंप चालक आक्रमक झाले आहेत. दुसऱ्यांच्या चुकीसाठी आम्हाला आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या या निर्णयाचा आम्ही निषेध करतो असे नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे सरचिटणीस सुदर्शन पाटील यांनी सांगितले आहे. तसेच या निर्णयाविरोधात नाशिक शहरातील सर्व पेट्रोल पंप 2 एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बाबत उद्या पदाधिकारी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची देखील भेट घेणार आहेत.

या निर्णय़ाने दीपक पांडेय (Police Commissioner Deepak Pandey) विरूद्ध पेट्रोल पंप चालक असा संघर्ष पेटला आहे. यात आता दीपक पांडेय (Police Commissioner Deepak Pandey) माघार घेतात की पेट्रोल पंप चालक आंदोलनावर ठाम राहतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news