देशात कोरोना पसरवण्याचे काम महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्लीतील 'आप' करत आहेत. यांनी गलिच्छ राजकारण देखिल केले आहे. अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केली आहे. या पक्षांनी राज्यांतून आलेल्या लोकांना त्यांच्या राज्यात परत जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्यामुळे कोरोनाचा हाहाकार झाला. याशिवाय त्यांनी काँग्रेसवर चांगलेच टीकास्त्र सोडलं होतं.
आज पुन्हा राज्यसभेत बोलताना त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. अचानक दृष्टी गेल्यावर शेवटचं जे चित्रं डोळ्यासमोर असंत तेच चित्रं कायम राहतं. तसंच काँग्रेसचं झालं आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता टीका केली. तर उलट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून काही तरी धडा घ्या. आजारी असूनही ते मतदारसंघातील लोकांना प्रोत्साहित करत आहेत. तुम्हाला एवढं नैराश्य का? असा सवाल देखिल मोदींनी विचारला आहे. शरद पवार (sharad pawar) यांचे तीनदा नाव घेत पंतप्रधानांनी कौतुक केलं.
जेव्हा हिरवळ असते, शेत-शिवार हिरवगार झालेलं असतं आणि कुणी जर ती हिरवळ पाहिली असेल तर त्याच वेळी अपघात होऊन त्याचे डोळे गेले तर आयुष्यभर त्याला तो हिरवं चित्रं दिसत असतं. तसंच 2013पर्यंत दिवस काढले. 2014मध्ये जनतेने अचानक प्रकाश निर्माण केला त्यातून कुणाची दृष्टी गेली असेल तर त्यांना ते जुने दिवसच दिसणार अशी जोरदार टिका मोदींनी राहुल गांधीवर केली आहे.