यास चक्रीवादळ पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी झालेल्या नुकसानीची आढावा बैठक घेऊन बाधित भागाचे सर्वेक्षण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत येस चक्रीवादळामुळे प्रभावित लोकांबद्दल शोक व्यक्त केले. पंतप्रधानांनी ओडिशा, बंगाल आणि झारखंडला तातडीने मदत कार्यांसाठी 1000 कोटींची आर्थिक मदत जाहीर केलीय. पंतप्रधानांनी मृताच्या नातलगांना दोन लाख रुपये आणि चक्रीवादळात जखमींना 50 हजार रुपयांची मदत दिली. या चक्रीवादळाच्या परिणामी ओडिशाचं सर्वाधिक नुकसान झालं. पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या काही भागांवरही याचा परिणाम झाल्याचे पंतप्रधानांना सांगण्यात आले. पंतप्रधानांच्या बंगालमधील आढावा बैठकीत ममता बॅनर्जी यांनी भाग घेतला नाही.