भाजप नेते नारायण राणे यांनी आज केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यानंतर नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधत महाराष्ट्राला न्याय देण्याच काम करेन, अशी प्रतिक्रिया दिली.
नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये पहिला मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 43 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामधील 15 मंत्र्यांना कॅबिनेट तर 28 मंत्र्यांना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार मंत्र्यांचा समावेश आहे. दरम्यान शपथ विधी सोहळ्यात भाजप नेते नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यानंतर त्यांनी मध्यमांशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे.पी. नडडा, देवेंद्र फडणवीस यांचे राणे यांनी आभार मानले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले. मला जी जबाबदारी मिळेल ती समर्थपणे सांभाळेन असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भातही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी सहकार्य करेन. तसेच आरक्षणाचा तिढा सोडवणार असल्याचेही त्यांनी म्हटले.