देशातील जनतेला गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मुच्युअल फंडातील गुंतवणुकीवर आताच्या घडीला अधिक भर दिला जात असल्याचे पाहायला मिळतय. देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे अर्थव्यवस्था कोलमडत असल्याचे चित्र असताना, दुसरीकडे मात्र, देशातील म्युच्युअल फंड उद्योगाने नवे शिखर गाठलय
. 2021 या आर्थिक वर्षात मुच्युअल फंड गुंतवणुकीत ४१ टक्के वाढ झाल्याची माहिती मिळालीय. कोरोच्या काळातही म्युच्युअल फंडमध्ये विक्रमी गुंतवणूक; तब्बल ४१ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे.