भाजपानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकूण ८० सदस्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी जाहीर केली आहे. या यादीत पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचा समावेश राष्ट्रीय कार्यकारिणीत करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना मार्गदर्शक बनवून मुख्य राजकीय प्रवाहातून बाजूला काढल्याची टीका विरोधकांकडून केली जात होती. आता मात्र या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना पक्षानं पुन्हा एकदा राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये स्थान दिलं आहे. ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचा समावेश राष्ट्रीय कार्यकारिणीत करण्यात आला आहे.
भाजपानं आपली राष्ट्रीय कार्यकारिणीची नवी यादी आज जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या चित्रा वाघ यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांच्या जबाबदारीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.