Mumbai

पाणी जपून वापरा! मुंबईत आजपासून ‘या’ भागात ३० तास पाणीपुरवठा बंद

Published by : Shweta Chavan-Zagade

मुंबईतील (Mumbai) काही ठिकाणी आजपासून (14 मार्च) ३० तास पाणी पुरवठा बंद (Water supply cut off) असणार आहे. मुंबईतील जी/दक्षिण आणि जी/उत्तर विभागातील काही परिसरात आजपासून ते उद्या दुपारी २ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर जी/ दक्षिण विभागातील काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. तानसा पूर्व आणि पश्चिम मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतल्याने पाणी पुरवठा बंद राहणार आहे. दादर, माटुंगा, माहिम, वरळी, प्रभादेवी अशा काही भागांमध्ये ३० तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

लोअर परळमधील सेनापती बापट मार्गावर गावडे चौकात सोमवारी (ता. १४) १४५० मिलिमीटर व्यासाच्या तानसा पूर्व आणि पश्‍चिम मुख्य जलवाहिन्यांवरील गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजता सुरू होणारे काम १५ मार्चच्या दुपारी २ पर्यंत चालणार आहे. परिणामी या काळात जी दक्षिण व जी उत्तर विभागांतील काही भागांत पाणीपुरवठा होणार नाही. काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

जी/दक्षिण विभाग : डिलाईल रोड बी. डी. डी., संपूर्ण प्रभादेवी परिसर, जनता वसाहत, संपूर्ण लोअर परळ विभाग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, गणपतराव कदम मार्ग, ना. म. जोशी मार्ग, वीर सावरकर मार्ग, एस. एस. अमृतवार मार्ग. १४ मार्च पाणीपुरवठा हाेणार नाही.

जी/उत्तर विभाग : संपूर्ण प्रभादेवी परिसर, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, सेना भवन परिसर, मोरी मार्ग, टी. एच. कटारिया मार्ग, कापड बाजार, पूर्ण माहीम (पश्चिम) विभाग, माटुंगा (पश्चिम) विभाग, दादर (पश्चिम) विभाग विभागांत १४ मार्च रोजी पाणीपुरवठा होणार नाही.

जी/दक्षिण विभाग : ना. म. जोशी मार्ग, डिलाईल रोड बीडीडी, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग आदी विभागांत १५ मार्च रोजी पाणी येणार नाही

जी/दक्षिण विभाग : धोबीघाट-सातरस्ता विभागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news