कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. मुंबईतील कोरोना स्थितीसुद्धा गंभीर झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. गुढीपाडव्याच्या नागरिकांना शुभेच्छा आहेत पण हा सण घरात राहूनच साजरा करा, असं आवाहन यावेळी पेडणेकर यांनी केलं आहे.
वॉर्डमध्ये नोडल ऑफिसरची नियुक्ती करणार असल्याची घोषणा यावेळी महापौरांनी केली आहे. कारण नसताना बेड्स अडवू नका, असंही त्या म्हणाल्या. आयसीयू २ हजार ४६६, सध्या ३ हजार ७७७ रिक्त बेड्स आहेत.
दरम्यान, येत्या 7 दिवसात ११०० कोव्हिड सेंटर्स कार्यान्वित करणार आहोत, असंही महापौर म्हणाल्या. रुग्णालयांची संख्या वाढवली आहे मात्र तरीही मुंबईकरांसह राज्यातील नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे, असं मत महापौर पेडणेकर यांनी व्यक्त केलं आहे.