1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात ( 1993 Mumbai serial blasts case) सहभागी असलेला अबू बकर या भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एकाला भारतीय सुरक्षा यंत्रणांनी अटक केली आहे. या हल्ल्याच्या वाईट आठवणींचे घाव आजही मुंबईकरांच्या मनात कायम आहेत. त्यामुळे तपास यंत्रणांकडून या स्फोटामागील मुख्य आरोपींचा शोध घेणे सुरु होते.
या साखळी बॉम्बस्फोटात हात असलेल्या अबू बकर या भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एकाला सुरक्षा यंत्रणेने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून अधिक माहिती मिळू शकणार आहे.
भारतीय तपास यंत्रणांनी 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला UAE मधून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अबू बकर असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव असून त्याला लवकरच UAE मधून भारतात आणले जाईल. 1993 मध्ये मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी 12 बॉम्बस्फोट झाले होते, ज्यामध्ये 257 लोकांचा मृत्यू झाला होता तर 713 लोक जखमी झाले होते.