Covid-19 updates

मुंबईत म्युकरमायकोसिसच्या रुग्णात वाढ

Published by : Lokshahi News


दिवसेंदिवस म्युकरमायकोसिसचे रुग्णांची संख्या मुंबईतही वाढत आहे. सध्या मुंबईत सुमारे ४०० रुग्ण आहेत. या रुग्णांच्या उपचारासाठी आवश्कयक असलेल्या अ‍ॅम्पोटेरेसिन-बी इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलीय. या समितीद्वारे खासगी आणि सरकारी रुग्णालयांना आता अ‍ॅम्पोटेरेसिन-बी इंजेक्शनचे वितरण केले जाईल. त्यामुळे इंजेक्शनच्या होणाऱ्या काळा बाजारावर रोख बसेल.

म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत असल्याने त्यावर उपचार म्हणून वापरण्यात येणारे अ‍ॅम्पोटेरेसिन-बी इंजेक्शनची मागणीही मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. परंतु मागणीच्या तुलनेत या इंजेक्शनचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे काळा बाजार होऊ शकतो. ते रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने या समितीची स्थापना केली. यासाठी नोडल अधिकाऱ्याचीही नियुक्ती केलेली आहे.

ही समिती रुग्णांना समप्रमाणात इंजेक्शनचा पुरवठा करेल. खासगी आणि सरकारी रुग्णालयांकडून रुग्णांसाठी मागणी केली जाते, त्यानुसार उपलब्ध साठा समप्रमाणात वितरित केला जातो. मुंबईत ४०० रुग्णांपैकी समजा १०० रुग्ण केईएममध्ये दाखल आहेत, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले. इंजेक्शनचा साठा कमी असल्याने रुग्णामधील आजाराची तीव्रता लक्षात घेऊन त्यानुसार इंजेक्शनचा साठ्याचे वितरण करण्यात येते. सध्या मुंबईत साधारणपणे ४०० रुग्ण असून प्रत्येकाला प्रतिदिन सहा याप्रमाणे २४०० इंजेक्शनची गरज आहे. परंतु बऱ्याचदा सर्वांनाच ते द्यावे लागते असे नाही. जूनच्या पहिल्या आठवडय़ापासून इंजेक्शनचा अधिक साठा उपलब्ध होईल, असे डॉ. देशमुख यांनी माहिती दिली.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result