Chhagan Bhujbal Team Lokshahi
Uttar Maharashtra

“छगन भुजबळ शाहू महाराजांचे वैचारिक वारसदार”

खासदार संभाजीराजे भोसले यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

Published by : Sudhir Kakde

राज्यसभा खासदार संभाजी राजे भोसले (Sambhaji Raje Bhosale) यांनी आज नाशिकमध्ये (Nashik) जाऊन मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी खासदार संभाजी राजेंनी पत्रकारांशी संवाद साधला. छत्रपती शाहू महाराजांचं आणि नाशिकचं जवळचं नातं होतं. सत्यशोधक समाजाची ताकद वाढवण्यासाठी शाहू महाराजांनी मदत केली होती. बहुजन समाजाला न्याय देण्याच्या मुद्दयावर आमच्यात चर्चा झाली असं खासदार भोसले यांनी सांगितलं. शाहू फुले आंबेडकरांचे विचार पोहोचवण्याचं काम छगन भुजबळ करत आहेत असं खासदार संभाजीराजे भोसले म्हणाले. त्यामुळे छगन भुजबळ यांना शाहू महाराजांचे वैचारीक वारसदार म्हटलं तर वावगं ठरणार नाही असंही खासदार संभाजी राजे भोसले म्हणाले. तसंच ६ मे छत्रपती शाहू महाराजांच्या ला स्मृती शताब्दी निमित्त कार्यक्रमानिमित्त या भेटीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.

फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी दैवत आहेत. ६ मे छत्रपती शाहू महाराजांच्या ला स्मृती शताब्दी निमित्त कार्यक्रम घेऊन, शाहू महाराजांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी आम्ही नियोजन करू असं त्यानंतर छगन भुजबळ यांनी सांगितलं. बहुजन समाज एक आहे, आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे असंही भुजबळ म्हणाले.

जुन्या आठवणींना उजाळा देताना भुजबळ म्हणाले, मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या विद्यार्थ्यांना गणपत राव मोरे जेवण द्यायचे, मात्र त्यांच्यावर दगडफेक करण्याचं काम काही विशिष्ट समाजातील लोकांनी केलं होतं. त्यानंतर शाहू महाराजांनी कोल्हापूरहून नाशिकमध्ये येऊन त्यांना ताकद दिली होती. एकुणच या सर्व चर्चेत दिलखुलास चर्चा झाल्याचं भुजबळ म्हणाले.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण