कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला होता. त्यातच ओमायक्रॉनचा शिरकाव झाला. आता कुठे कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताने दिसत आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या भितीमुळे वर्क फ्रॉम होम सुरु करण्यात आले होते. मात्र आता कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये झालेली घट आणि ओमिक्रॉन प्रकाराचा कमी धोका लक्षात घेऊन सोमवारपासून सर्व कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयात पूर्ण उपस्थिती करण्याची सूचना देण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी सांगतले की. कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच त्यांनी सांगितले की, सोमवारी कोणतीही शिथिलता न ठेवता पूर्ण हजेरी सुरू होईल. ७ फेब्रुवारी २०२२ पासून सर्व कर्मचारी नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहतील.