India

“मी कोब्रा… एक दंश झाला तरी फोटो बनाल,” – मिथुन चक्रवर्ती

Published by : Lokshahi News

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कोलकातामध्ये त्यांनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं. भाजपामध्ये प्रवेश झाल्यानंतर ते आक्रमक भूमिकेत दिसून आले. "मी एक नंबरचा कोब्रा आहे… एक दंश जरी झाला तरी तुम्ही फोटो बनून जाल," असं मिथुन चक्रवर्ती म्हणाले. ते कोलकाता येथे पार पडलेल्या ब्रिगेड ग्राऊंड येथील रॅलीत बोलत होते.

"मी बंगाली आहे त्याचा मला अभिमान आहे. मला माहितीये की तुम्हाला माझे डायलॉग्ज आवडतात," असंही मिथुन चक्रवर्ती यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या चित्रपटातील एका डायलॉगदेखील म्हटला. "हे सर्व पाहून आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटत आहे. मी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाच्या पंतप्रधानांसह मंचावर उभा राहणार आहे. हे खरंच स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे," असंण ते म्हणाले.

यापूर्वी मिथुन चक्रवर्ती राज्यसभेचे सदस्य होते. त्यांनी ममता बॅनर्जींचा पक्ष टीएमसीने मिथुन यांना राज्यसभेत खासदारकी दिली होती. ते 2014 पासून डिसेंबर 2016 पर्यंत टीएमसीकडून राज्यसभेत खासदार होते. पश्चिम बंगालमध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग आहे.

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती