राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) ईडी बुधवारी कार्यालयात ( ED Office )दाखल झाले आहे. काही दिवसापूर्वीच ईडीने नवाब मालिकांना समन्स बजावला असल्याची माहिती आहे. हे समन्स कोणत्या प्रकरणात बजावण्यात आले होते, याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. या चौकशीतून आता काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय तपास यंत्रणेने कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित असलेल्या मालमत्तांच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मुंबईत ईडी (mumbai ed) पथकांच्या अनेक धाडी पडल्या होत्या. यावेळी दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्याशी संबंधित मालमत्तांवरही छापे पडले होते. तर दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकर यालाही ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली होती. त्यानंतर डी गँग आणि राजकीय नेत्यांच्या कनेक्शनप्रकरणी ईडीचा तपास सुरु असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर आता नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी बोलावल्याने अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.
तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नवाब मलिक (Nawab Malik ) यांनी १९९३च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीकडून कुर्ला परिसरात जमीन खरेदी केल्याचा आरोप केला होता. १९९३ च्या मुंबई (mumbai bomspot ) बॉम्बस्फोटातील गुन्हेगार शाह वली खान आणि मोहम्म सलीम इशाक पटेल ऊर्फ सलीम पटेल यांचे नवाब मलिक व त्यांच्या कुटुंबीयांशी संबंध असून मलिक कुटुंबाच्या मालकीच्या कंपनीनं त्यांच्याकडून कोट्यवधींची जमीन कवडीमोल भावात खरेदी केली आहे,' असा आरोप फडणवीस यांनी केला. मुंबईत कुर्ला भागातील एलबीएस रोडवर गोवावाला कम्पाउंड नावााची ही जमीन आहे, असे फडणवीस यांनी सांगितले आहे. याच जमीन खरेदीप्रकरणी ईडीकडून नवाब मलिक यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.